गंगापूर (छत्रपती संभाजीनगर): ग्राहकांकडून वसूल केलेली ६८ हजार रुपयांची रोकड स्वतःकडेच हडपण्यासाठी एका खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने अत्यंत शिताफीने स्वतःच्याच अपहरणाचा आणि लुटीचा एक खोटा बनाव रचला. मात्र, गंगापूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवत अवघ्या काही तासांत या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत फायनान्शियल कंपनीच्या गंगापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक योगेश तुळशीराम गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीत क्षेत्र सहाय्यक (फिल्ड असिस्टंट) म्हणून कार्यरत असलेला किरण पंढरीनाथ वैरागर (रा. पानसलाना, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर; ह.मु. गंगापूर) हा सोमवारी लासूर परिसरात महिला सदस्यांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी गेला होता. सायंकाळी व्यवस्थापकांशी बोलणे झाल्यानंतर अचानक त्याचा मोबाईल फोन बंद येऊ लागला. काही वेळातच एका अज्ञात व्यक्तीने व्यवस्थापकांना फोन करून माहिती दिली की, लासूर-गंगापूर रस्त्यावर किरण याचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत असून तो गंभीर जखमी आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या हातावर, छातीवर आणि पाठीवर चाकूच्या जखमा होत्या तसेच त्याचा शर्ट फाटलेला होता. चार अनोळखी इसमांनी बळजबरीने शेतात नेऊन आपल्यावर चाकूने वार केले आणि वसुलीची ६८ हजार ५६ रुपयांची रोकड लुटून नेली, असा कांगावा त्याने पोलिसांसमोर केला. मात्र, किरणने सांगितलेल्या या बनावट कहाणीवर पोलिसांना पहिल्या क्षणापासूनच संशय आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. तांत्रिक पुरावे आणि पोलिसी खाक्या दाखवताच किरणने बडगा मोडून आपला गुन्हा कबूल केला. त्याचा मित्र रवी ज्ञानदेव दरंदले (रा. शनिशिंगणापूर) याला पैशांची मोठी अडचण असल्यामुळे, ही वसुलीची रक्कम लाटण्यासाठी किरणने मित्रांच्या साथीने हा सर्व बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कटात आकाश साहेबराव हटकर (रा. शनिशिंगणापूर) हा देखील सामील होता. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- पुणे: 'डीजेविरोधी' भूमिकेमुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट थेट राजकारणात उतरणार का? पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून चर्चांना उधाण!
- नागपूर: उद्योगपतींसाठी पायघड्या, भूमिपुत्रांच्या वाट्याला दडपशाही; नागपूरच्या शिवणगावात प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध तीव्र संताप!
- पुणे: रोहित पवारांच्या आंदोलनाला मोठा धक्का; अलका टॉकीज चौकातील आंदोलनास पोलिसांचा नकार, दिले पर्यायी ठिकाणांचे प्रस्ताव!
महाराष्ट्र
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- वर्धा: शाळेतून शेतात नेले अन् नियतीने सर्वकाही हिरावून घेतले! वर्धा येथे विहिरीत पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




