आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रदर्शनासाठी अवघा महिना शिल्लक राहिला असताना सीक्वेलविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धुरंधर 2’मध्ये सर्वांत मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलाविषयीची माहिती समोर आल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धरने नमतं घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
‘धुरंधर’ हा चित्रपट त्याच्या रनटाइममुळे प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. रणवीर सिंहचा हा चित्रपट 3 तास 34 मिनिटांचा होता. इतका मोठा चित्रपट प्रेक्षकांना पूर्णवेळ खुर्चीला खिळवून ठेवू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचं उत्तर सर्वांनाच मिळालं. बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करून या चित्रपटाने बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्या. अगदी शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत प्रेक्षक थिएटरमध्ये थांबल्याचं पहायला मिळालं होतं.
आता सीबीएफसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ‘धुरंधर 2’ला 9 फेब्रुवारी रोजी प्रमाणपत्र देण्यात आलं. या तपशीलांवरून असं दिसून येतंय की या सीक्वेलची लांबी ही पहिल्या भागापेक्षा थोटी कमी आहे. हा फरक तसा फार मोठा नाही, तो फक्त 6 मिनिटांचा आहे. ‘धुरंधर 2’चा रनटाइम 3 तास 28 मिनिटांचा आहे.
‘धुरंधर’ला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणजेच तो चित्रपट फक्त प्रौढांसाठीच योग्य होता. त्यातील हिंसक दृश्ये अत्यंत क्रूर आणि भयानक पद्धतीने दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्याला ‘अ’ प्रमाणपत्र मिळणंच योग्य होतं. परंतु ‘धुरंधर 2’मध्ये झालेला मोठा बदल म्हणजे या सीक्वेलला U/A 16+ अशी रेटिंग मिळाली आहे. पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागात अधिक हिंसाचार दिसेल असं वाटलं होतं. परंतु या रेटिंगवरून हे स्पष्ट होतंय की सीक्वेलमधील सीन्स पहिल्या भागाइतकी तीव्र किंवा हिंसक नाहीत. पहिल्या भागात दाखवलेल्या हिंसेवरून अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धरने एक पाऊल मागे घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


