पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!

पुणे: उपचारासाठी भाच्याच्या घरी राहण्यास आलेल्या सख्ख्या मामाचा भाच्याने धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची आणि त्यानंतर भाच्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरूनगर येथील माधवनगर (ता. खेड) परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

संदीप वामन गडदे (वय ४३) यांचा मृत्यू झाला असून प्रवीण कैलास कोहिणकर (वय २०) याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संदीप गडदे हे आजारी असल्याने उपचारासाठी गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून भाचा प्रवीण याच्या घरी राहत होते. शनिवारी सकाळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर प्रवीणने संदीप यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीणनेही त्याच घरात गळफास घेत आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली असून, त्यात "मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे" असा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या चिठ्ठीतील नेमका मजकूर आणि घटनेमागील खरे कारण काय? याबाबत खेड पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *