मुस्लिम आरक्षण रद्दImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
AIMIM Reaction on Muslim Reservation abolition: राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास मुस्लिमांना देण्यात आलेले 5% आरक्षण रद्द केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना या 5% आरक्षणातंर्गत प्रवेश मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
ही तर रमजानची भेट
इम्तियाज जलील यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिमांना रमजानची भेट दिली आहे. सरकारने 5% आरक्षण संपुष्टात आणले आहे. जलील यांनी सरकारवर हल्ला चढवला. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा स्तर आणि शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केल्यानंतर हे आरक्षण देण्यात आले. त्यानंतर सरकारने आता मुस्लिमांना देण्यात येणारे 5% आरक्षण संपुष्टात आणण्यात आले आहे. यानंतरही मी मुस्लिम मुलं आणि मुलींना आवाहन करेल की त्यांनी शिक्षण सोडू नये. पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया!’
कोणत्या आधारावर 5% आरक्षण
महाराष्ट्रात वर्ष 2014 मध्ये एक अध्यादेश काढला होता. त्यानुसार, मुस्लिम समाजातील विशेष मागास प्रवर्गातील -ए (SBC-A) मधील सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 5% आरक्षण देण्यात आले होते. या आधारावर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 14 नोव्हेंबर 2014 रोजी हायकोर्टाने या अध्यादेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर अध्यादेश 23 डिसेंबर 2014 रोजीपर्यंत त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. परिणामी हा अध्यादेश निरस्त (Lapse) झाला. आता सरकारने स्पष्ट केले आहे की, अध्यादेशाच्या आधारावर जे काही शासन निर्णय आणि परिपत्रक रद्द झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मुस्लिमांसाठी 5 टक्के आरक्षण रद्द आहे.
सर्व संबंधित आदेश आता प्रभावी नाहीत
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, आता महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये या 5% आरक्षणातंर्गत प्रवेश मिळणार नाही. नवीन जात प्रमाणपत्र वा वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. त्यामुळे यापूर्वीचे सर्व आदेश प्रभावी राहणार नाहीत. त्यामुळे मुस्लिम तरुणांना प्रवेशासाठी मोठी अडचण येऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम तरुणांमध्ये नाराजी आहे. तर AIMIM आणि इतर विरोधी पक्षांनी या आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




