
Yavatmal : राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज यवतमाळ जिल्ह्यात पार पडत आहे. या कार्यक्रमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मात्र यवतमाळमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या गावबंदीच्या आवाहनानंतर यवतमाळमधील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा संघटनाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पोस्टरला अज्ञांताकडून काळे फासण्यात आले आहे. पोस्टर नगरपालिकेकडून काढण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही. देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडच्या रायपूर येथे निवडणूक प्रचाराला जाणार आहेत तर अजित पवार यांना डेंगू झाल्याने ते गैरहजर राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण विदर्भातून तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. जागोजागी फिक्स पॉईंट लावण्यात आले. विमानतळ ते सभा या रस्त्यादरम्यान पोलिसांचा काल रात्रीपासून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सभास्थळी आत सोडताना तपासणी करूनच सोडण्यात येणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत आहे अशात हा कार्यक्रम होत आहे. यवतमाळच्या माहागाव, उमरखेड या भागात मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांचे ,बेरोजगारांचे प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
|
Manoj Jarange Patil : '30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू नंतर..', जरांगे पाटीलांचा सरकारला गंभीर इशारा |
जवळपास 35 हजार लाभार्थी उपस्थित राहण्याची शक्यता
सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन राबवित असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रम किन्ही या गावाजवळ आयोजित करण्यात आला. जवळपास 35 हजार लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यातील काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रत्यक्ष लाभाचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्यासह विविध विभागांचे स्टॅाल राहणार आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली जातील. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येण्याची आणि जाण्याची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. सुरक्षा दृष्टीने संपूर्ण विदर्भातील 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांना बंदी घालण्याची शक्यता
मराठा आरक्षणाचं लोण राज्यभरात पसरत असताना आता आंदोलनाची धग तीव्र होतांना दिसत आहे. राज्यभरात सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी आहे. आमदार-खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सकल मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे यवतमाळ मध्ये मुख्यमंत्र्यांना बंदी घालण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



