एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!

आजच्या डिजिटल युगात जरी अनेक जण ऑनलाइन पेमेंटचा वापर करत असले, तरी रोख रकमेची गरज अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. अशा परिस्थितीत, एटीएम हे सामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मात्र, आता दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये एटीएममध्ये रोख रक्कम भरणारे (कॅश लोडिंग) कर्मचारी संपावर गेल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

या संपामुळे संबंधित राज्यांमधील अनेक एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. जर एटीएममध्ये वेळेवर पैसे भरले गेले नाहीत, तर ग्राहकांना रोख रकमेसाठी मोठी गैरसोय सहन करावी लागेल. तुम्हीही जर या राज्यांत राहत असाल, तर येत्या काही दिवसांत रोख रकमेच्या उपलब्धतेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *