पुणे: मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकेंडला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तीन वेगवेगळ्या तरुणांना पाण्यात बुडून आपला जीव गमवावा लागल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत पवना आणि इंद्रायणी नदीच्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये या दुर्घटना घडल्या. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मावळ तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या दुर्घटना:
-
पहिली घटना (बेबडओहळ - पवना नदी): शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेबडओहळ परिसरातील पुलाजवळ तीन मित्र फिरण्यासाठी आले होते. नदी पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून जाऊ लागले. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमने तात्काळ धाव घेत दीपक कुमार आणि रमाकांत दारवा या दोघांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र अरमान कुंभार (वय २१, रा. पिंपरी-चिंचवड, मूळ रा. झारखंड) हा पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेला. 'वन्यजीव रक्षक मावळ' टीमने शोधमोहीम राबवून रविवारी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
-
दुसरी घटना (कुंडमळा - इंद्रायणी नदी): तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे भोसरी येथील बालाजीनगर परिसरातील तीन मित्र आले होते. येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेला निखिल कुशबा कानडे (वय २१, रा. भोसरी) हा तरुण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. रेस्क्यू टीमने त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
-
तिसरी घटना (देहू - इंद्रायणी नदी): देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत तुकाराम महाराज देहू येथील गाथा मंदिराजवळील चार पूल परिसरातील इंद्रायणी नदीच्या डोहात एक ४० ते ४५ वर्षीय अज्ञात इसम बुडाल्याची घटना घडली. रविवारी त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला असून देहू पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे धरण, नदी आणि प्रसिद्ध कुंडांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अनेकदा पाण्याचा वेग, खोली आणि डोहांच्या धोकादायक रचनेचा अंदाज येत नसल्याने क्षणिक आनंदासाठी केलेले धाडस जीवघेणे ठरत आहे. नदी किंवा धरण परिसरात उतरताना पर्यटकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि स्थानिक पोलिसांनी केले आहे.
शहर
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
महाराष्ट्र
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



