Wardha Crime News : नायब तहसीलदारांच्या पथकावर वाळू चाेरट्यांचा हल्ला, आर्वीत चौघांना अटक

Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यात वाळू चोरट्यांनी चक्क नायब तहसीलदारांच्या पथकावर हल्ला केल्याची धक्कादयक घटना घडली. या पथकातील सदस्यांचा मोबाइल हिसकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सूरज चव्हाण यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली. आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चाैघांना अटक केली आहे. 

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : आर्वी तालुक्याच्या नांदपूर वाळू घाटातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार देवीदास सोरते, तलाठी सूरज चव्हाण हे कर्मचा-यांसह मध्यरात्री नांदपूर घाटावर गेले.

Wardha Crime News: नायब तहसीलदारांच्या पथकावर वाळू चाेरट्यांचा हल्ला, आर्वीत चौघांना अटक

घाटावर काही जण अवैधरीत्या वाळूउपसा करीत असल्याचे नायब तहसीलदार सोरते व त्यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांना पथकाने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाळू चोरट्यांनी अश्लील शिवीगाळ करीत पथकातील सदस्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणाची तक्रार तलाठी सूरज चव्हाण यांनी आर्वी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी संदेश गलाट, समीर घोडे यांच्यासह त्यांच्या दोन सहका-यांना अटक करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply