छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सुरु आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या सिझनमध्ये सतत वाद, भांडणे आणि ड्रामा यामुळे चर्चेत राहिलेल्या घरात आता प्रेमाचे सुंदर क्षण दिसू लागले आहेत. यापूर्वी रुचिता आणि विशाल यांच्या नात्याची चर्चा होती, आता मात्र करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यातील केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दोघांमध्ये खरंच प्रेम बहरत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि हा गुपचूप रोमान्स बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कॅप्टन्सी टास्कमध्ये मजेदार रोमान्टिक क्षण
नुकताच कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉसच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कॅप्टन्सीचा नवा टास्क दाखवला आहे, ज्यात घरातील सर्व सदस्य फळांमध्ये रूपांतरित झाले आहेत. प्राजक्ता स्ट्रॉबेरी बनली आहे, तर करण संत्रा झाला आहे. बिग बॉस प्राजक्ताची स्ट्रॉबेरी म्हणून कौतुक करतात, “प्राजक्ता, तुम्हाला स्ट्रॉबेरी छान वाटते आहे का?” असं विचारतात. प्राजक्ता गोड लाजते, हसते आणि थँक्यू म्हणते. त्याचवेळी तिच्या मागे उभा असलेला करणही लाजताना दिसतो. बिग बॉस हे लगेच पकडतात आणि मजेशीर अंदाजात विचारतात, “स्ट्रॉबेरीचं कौतुक केल्यावर संत्री का लाजली?” दोघेही पुन्हा लाजून हसतात.
नंतर दोघे एकत्र बसलेले दिसतात आणि फळांच्या बोर्डच्या आड एकमेकांची छेड काढताना, हलकेफुलके फ्लर्ट करताना दिसतात. हे दृश्य पाहून नेटिझन्सनी लगेच “हे खरंच लव्ह अँगल आहे” असा शिक्कामोर्तब केला आहे.
करणने प्राजक्तासमोर व्यक्त केलेल्या भावना
याआधीच करणने प्राजक्तासमोर आपल्या मनातील भावना उघड केल्या होत्या. एका संवादात प्राजक्ता प्रभूला विचारते की, करण आणि तन्वीमध्ये किती अंतर आहे. हे ऐकून तन्वी प्राजक्ताला करणबद्दल विचारते. तन्वी म्हणते, “करण तुला मांडीवर घेऊन डोक्याला मसाज करतो, तेव्हा काय वाटतं?” करण तन्वीला सुनावतो आणि इतरांना सांगतो की, “आमच्यामध्ये प्रेम असो, मैत्री असो किंवा लग्न असो, पण आम्ही दोघेही इंडिव्हिज्युअल खेळतो.”
राकेशला करण सांगतो, “तिला जप, तिच्या भावनांचा आदर कर.” नंतर करण भावुक होऊन प्राजक्ताला म्हणतो, “आयुष्यात मी कोणाशी इतका कनेक्ट झालो नव्हतो. तुझी काळजी वाटायला लागली आहे. असं कधीच झालं नव्हतं. आई-वडिलांनंतर पहिल्यांदा असं फील झालं. मला इमोशनल व्हायचं नव्हतं, पण हे बंद रस्ते आता उघडले आहेत. आपण जेन्युईन राहू.” प्राजक्ता त्याला समजावते, “एवढा जास्त विचार करू नकोस. मला बिग बॉसनंतरचं आयुष्यही महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतील हे लक्षात ठेव.”
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




