Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

Nagpur to Mumbai Vande Bharat Express Train: भारतामध्ये सध्याच्या घडीला तबब्ल १३६ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. त्यामध्ये आणखी भर पडणार आहे. कारण, रेल्वेचे जाळं मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून आणखी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express train) सुरू करण्यात येणार आहेत. चेन्नई येथील रेल्वे फॅक्टरीमध्ये नव्या बोगींची निर्मिती केली जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवास वेगवान आणि आरामदायी होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशातील दोन मोठ्या शहरांना जोडले जात आहे. लवकरच नागपूर ते मुंबई (Nagpur To Mumbai ) या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गावर ट्रेनची संख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेकडून वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

मुंबई ते नागपूर यादरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारतचे तिकिट किती असेल? बोगी किती असतील? नागपूर ते मुंबई या प्रवासावेशी ट्रेन कोण कोणत्या स्टेशनला थांबणार? आठवड्यातून कितीवेळा ट्रेन धावणार? नागपूर ते मुंबई या प्रवासाला किती वेळ लागणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

नागपूर ते मुंबई किती वेळ लागणार? 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ८३७ किमीचा नागपूर-मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस (Nagpur to Mumbai Vande Bharat Express train) फक्त ९ तासांत पूर्ण करणार आहे. म्हणजेच, प्रवासाचा वेळ पाच ते सहा तास वाचणार आहे. इतर रेल्वेंना मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेसमुळे ६ ते ९ तासांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply