
Pandharpur : दुष्काळी भाग शिवाय खडकाळ जमीन. यात काय पिकवायचे हा प्रश्न कायमचा आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्याने अत्यंत कमी पाण्यात खडकाळ माळरानावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे. यातून यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास १५ टन उत्पादन अपेक्षीत आहे. सध्या दोन टन आंब्याची पुण्याच्या बाजारपेठेत तीनशे रुपये किलो दराने विक्री केली आहे
पंढरपूरच्या सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. शिवाय या भागात सुपीक अशी जमीन फार कमी आहे. यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येत नसते. मात्र पदवीधर असलेल्या सोमनाथकडे वडीलोपार्जित असलेल्या सहा एकर शेती आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने पावसाळी हंगामात पिके घेतली जायची. यामुळे वेगळा प्रयोग करण्याचे सोमनाथने ठरविले. कमी पाण्यात आणि उपलब्ध साधनांना अत्यंत कुशलतेने वापर करुन सोमनाथ यांनी २०२० साली पाच एकर खडकाळ माळरानावर केशर आंब्याची लागवड केली.
ठिबक सिंचनाद्वारे जोपासली बाग
लक्ष्मीनगर भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पावसाळ्याच्या पाण्यावर शेती केली जाते. वेगळा प्रयोग म्हणून सोमानथ यांनी धाडसाने आंबा फळ बागेची लागवड केली आहे. ठिंबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात बाग जोपासली आहे. मोठ्या कष्टाने जोपासलेल्या बागेने यंदा सोमनाथ यांना लखपती केले आहे. सध्या आंब्याची काढणी सुरु झाली आहे. लागवडीपासून तीन वर्षानंतर फळधारणा सुरु झाली. यावर्षी पोषक हवामान आणि बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फळांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदाच्या हंगामात किमान १५ टन उत्पादन अपेक्षित आहे.
दोन टन आंब्यांची विक्री
आतापर्यंत दोन टन आंब्याची पुणे येथील बाजारात तीनशे रुपये प्रती किलो दराने विक्री केली आहे. त्यातून सहा लाख रुपये मिळाले आहेत. आणखी बागेत सुमारे १३ टन आंबा शिल्लक आहे. सरासरी दोनशे रुपये प्रती किलो भाव मिळाला; तर आणखी २६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाच एकर बागेसाठी खते, किटक नाशक फवारणी, मजूर, तोडणी आणि वाहतूकीसाठी तीन ते साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वजा जाता आंबा पिकातून किमान ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल; असा विश्वास सोमनाथ नरळे यांनी व्यक्त केला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




