
नवी दिल्ली: भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बुधवारी झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर उपस्थित राहिल्यानंतर, शिंदे गटाला अधिकृतपणे ‘एनडीए’मध्ये स्थान देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार शिंदे गटात येण्याची भाजप प्रतीक्षा करत आहे.
शिवसेनेचे खासदार भाजपला पाठिंबा देतील, तेव्हा शिंदे गट ‘’एनडीए’’मध्ये सहभागी झाला असे म्हणता येईल, असा युक्तिवाद केसरकर यांनी बुधवारी केला. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी मुर्मूना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाही मुर्मूना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
सध्या शिवसेना ना ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे, ना काँग्रेसच्या ‘यूपीए’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) आघाडीचा. शिंदे गटातील ५० आमदारांनी ‘’एनडीए’’चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या ‘’एनडीए’’च्या बैठकीत सहभागी होण्याचे शिंदे गटालाही निमंत्रण देण्यात आले होते. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर या बैठकीला उपस्थित होते.
शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही शिंदे गटात सहभागी होतील असा भाजपचा कयास आहे. शिवाय, शिवसेनेचे नगरसेवकच नव्हे तर, शाखा आणि जिल्हाप्रमुखही शिंदे गटात सामील होतील. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल. त्यानंतर, शिंदे गटाला अधिकृतपणे ‘’एनडीए’’मध्ये स्थान दिले जाऊ शकेल. शिवसेनेमुळे रिक्त झालेले मंत्रीपदही शिंदे गटाला दिले जाऊ शकेल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ‘’उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला आमच्याकडे यावे लागेल. तसे झाले तर पुन्हा शिवसेनेशी भाजप युती करू शकेल. मग, ही शिवसेना ‘’एनडीए’’चा घटक पक्ष बनू शकेल’’, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सांगितले. ‘’ महाविकास आघाडी करून शिवसेना पक्ष संपू लागली होती, असे आमदारांना, खासदारांना वाटते. जेव्हा शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखांपर्यंत शिवसेनेच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवलंब करावा असे वाटेल, तेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील’’, असा दावा केसरकर यांनी केला आहे.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




