Vadhavan Airport : मुंबईजवळ समुद्रातील पहिलं विमानतळ उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे प्रस्ताव अद्याप का नाही?

Palghar : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीदरम्यान, तसेच मिरा-भाईंदर आणि वसई परिसरातील जाहीर सभांमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झालेला नाही. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. सवरा यांनी पालघर विमानतळ प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. विकासासोबतच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाढवण बंदराजवळ समुद्रात (ऑफशोअर) विमानतळ उभारण्याच्या संकल्पनेमुळे मासेमारी
क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले की, विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात, पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. मच्छिमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार नाही. आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Budget 2026 Income Tax : अर्थसंकल्पात आयकराबाबत मोठ्या घोषणा; मध्यमवर्गाला दिलासा की अपेक्षाभंग? 1 एप्रिलपासून काय बदलणार?

केवळ घोषणा
राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार विमानतळासाठी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करेल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेमध्ये दिले. त्यामुळे सध्या विमानतळाबाबत केवळ घोषणाच झाल्या असून, प्रत्यक्ष प्रस्तावाची प्रक्रिया अद्याप रखडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

2 thoughts on “Vadhavan Airport : मुंबईजवळ समुद्रातील पहिलं विमानतळ उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे प्रस्ताव अद्याप का नाही?

Leave a Reply to Kathy3256 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *