Uddhav Thackeray : आमचं सरकार सत्तेत येतंय, तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर

Uddhav Thackeray : केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिली आहे. मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे, हे दाखवून द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेतून बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यात ठिकठिकाणी वादळी सभा घेत आहेत. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे  मतदारांसह शिवसैनिकांना करत आहे.

Mumbai Crime : नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग; मुंबईच्या गावदेवी परिसरातील धक्कादायक घटना

उद्धव ठाकरेंची गडकरींना पुन्हा ऑफर

पुसद येथील जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "नितीन गडकरी हे तत्कालिन युती सरकारमधील धाडसी मंत्री होते. त्यांचा वेगळाच रुबाब होता. गडकरींनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केलं".  

"नितीन गडकरी  यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण गेल्या आठवड्यात भाजपने लोकसभेच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मोदी अमित शहा यांची नावे आहेत. इतकंच नाही, तर कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या माणसाचे नाव आहे. पण गडकरींचं नाव नाही. भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही, याबाबत मला कल्पना नाही".

पण नितीन गडकरी महाविकास आघाडीसोबत आल्यास आम्ही त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशात आमचं (महाविकास आघाडीचं) सरकार येणार असून आम्ही तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर देखील उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती. ठाकरेंच्या या ऑफरवर गडकरींनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply