
Tulja Bhavani Temple :आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास कांही पुजारी, व्यापारी आणि कांही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. देवीची मंचकी निद्रा सुरु आहे. तसेच 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून, याची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेतला जात आहे. तर काही पुजारी आक्रमक झाले असून, आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद पाहायला मिळत आहे.दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे. दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली असून, सकाळपासून मंदिर परिसरात असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत असून, या बंदचे चित्र 10 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे.
|
|
काय आहे प्रकरण?
तुळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अराखड्याचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यावर सुचना भाविक, पुजारी, व्यापारी, स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे. 16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनावर चर्चा होणार आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत नागरिक व भाविकांनी केलेल्या सुचनावर तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल व त्यानंतर 26 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतीम अहवाल सादर करण्यात येणार आहे. मात्र, याच विकास अराखड्याला विरोध केला जात आहे.
राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिय...
दरम्यान या सर्व प्रकरणावर आणि आज पुकारण्यात आलेल्या बंदबाबत राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. "सर्वांना विनंती आहे की, बंद वैगरे करणं योग्य वाटत नाही. जे काही काम करण्यात येत आहे ते आपल्याला विश्वासात घेऊनच केले जात आहे. सर्वांना अंतिम आराखडा दाखवून आणि सर्वांची मान्यता घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, या विशाल कामामध्ये आपली सकारात्मक राहावी”, असे राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




