
Action on Drugs in Solapur : मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्सचा गोरख धंदा चालत होता. तर, गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्स निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबई च्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.
सोलापूर येथील कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2016 साली सोलापुरातील याच चिंचोळी एमआयडीसी परिसरातील अवोन लाईफ साईन्सेस नावाच्या कंपनीत अशाच पद्धतीने ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्सचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी देखील तब्बल 18 हजार 623 किलो ड्रग्स ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई करण्यात आली आहे.
|
Chiplun Bridge Collapse : चिपळूणमध्ये पुलाचा काही भाग कोसळला; नागरिकांची पळापळ, |
मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंदा
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्सवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिकमधून 300 कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त केले होते. तर, त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली मोठी कारवाई केली होती. यावेळी नाशिक पोलिसांनी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त केला होता. यापूर्वी मुंबईत अशा कारवाई झाल्याच्या पाहायला मिळायच्या. मात्र. आता मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंदा सुरु असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी देखील चिंचोळी एमआयडीसीत कारवाई...
मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्सचा गोरख धंदा चालत होता. विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच चिंचोली एमआयडीसीत अशीच कारवाई करण्यात आली होती. सुमारे दोन हजार कोटींची इफेड्रीन पावडरचा गोदामामध्ये बेकायदा साठा करून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. चिंचोळी एमआयडीसीमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीच्या गोदामात छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीच्या गोदामातून सुमारे 18 हजार 627 किलो 600 ग्रॅम इफेड्रीन व सुडो इफेड्रीन पावडर जप्त करण्यात आला होता.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




