ठाणे/भिवंडी:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी (TET Paper Leak Case 2026) पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) करण्याचे आदेश दिले आहेत. या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी ८ आरोपी आधीच जेलमध्ये आहेत आणि आता आणखी दोघांची कोठडीत रवानगी झाल्याने तपासाला गती मिळाली आहे.
आरोपींची नावे आणि त्यांचे कारस्थान आले समोर
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या या दोन आरोपींची नावे पवन यादव (Pawan Yadav) आणि हरीओम सिंग (Hariom Singh) अशी आहेत. त्यांना बिहारमधील पाटणा येथून एसआयटीने मागच्या आठवड्यात अटक केली होती. तपासात समोर आले आहे की:
-
हरीओम सिंग: याने दिल्ली ते मुंबई दरम्यान लीक झालेला प्रश्नपत्रिका संच पोहोचवण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली होती आणि वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था सांभाळली होती.
-
पवन यादव: याच्या बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार तपासले असता, या प्रकरणाचा मुख्य फरार मास्टरमाइंड बिजेंद्र गुप्ता आणि त्याच्या अटकेत असलेल्या पत्नीसोबत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
मुद्रणालयापासून ते एजंटांपर्यंतचे धागेदोरे उघड
या महाघोटाळ्याचे धागेदोरे दिल्ली, उत्तर प्रदेश (आग्रा), बिहार आणि हरियाणा अशा चार राज्यांमध्ये पसरले आहेत. आग्रा येथील ज्या गुप्त मुद्रणालयात (Printing Press) टीईटीच्या प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तिथल्याच तीन कर्मचाऱ्यांनी (नरेश माहोर, संजय शर्मा आणि बाबूलाल कुशवाह) कोट्यवधी रुपयांच्या आमिषाने पेपर लीक करून मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्याकडे सुपूर्द केला होता. हा पेपर १ कोटी ५० लाख रुपयांना विकण्याचा आरोपींचा डाव होता, जो भिवंडी पोलिसांनी परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी उधळून लावला.
६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; मास्टरमाइंडचा शोध सुरू
या पेपर फुटीमुळे ऐनवेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ६ लाखांहून अधिक उमेदवारांची टीईटी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सध्या भिवंडी आणि ठाणे पोलीस या रॅकेटचा मुख्य किंगपिन बिजेंद्र गुप्ता याच्या शोधासाठी विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




