
पुणे : लष्कर ए तोएबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी अटक केली. संशयित दहशतवादी तरुणाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी मोहम्मद जुनेद मोहम्मद अता (वय २४, रा. दापोडी) याला अटक करण्यात आली असून दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. दहशतवादी संघटनांसाठी तो पैसे गोळा करण्याचे काम करत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
जुनेद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गोंधनापूर गावातील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. गेल्या दोन वर्षांत तो सहा वेळा काश्मीरमध्ये जाऊन आला होता. जुनेदच्या संपर्कात आणखी दोन ते तीन जण आहेत. जुनेद आणि त्याच्या साथीदारांनी गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली होती. तो आणि त्याचे साथीदार घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते. जुनेदने शस्त्रात्र चालविण्याचे तसेच स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचाही संशय आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अन्सार गझेवतुल हिंदू ताहीद असा समूह समाजमाध्यमावर करून राष्ट्रविरोधी कारवाया तसेच चिथावणी देणारे संदेश या समूहाद्वारे प्रसारित करण्यात आले होते. या समूहात जुनेद सामील झाला होता. त्यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अॅड. विजयकुमार फरगडे यांनी युक्तिवादात न्यायालयाकडे केली.
शहर
- मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहिल्यानगर: तुकाराम मुंढेंचा दणका: कारवाईच्या भीतीने अहिल्यानगरमध्ये 'सुट्या तेलाची' विक्री बंद; ग्राहकांमध्ये खळबळ
गुन्हा
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
























Subscribe to my channel


