Surat Diamond Bourse : PM नरेंद्र मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट; 'सुरत डायमंड बोर्स', विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन

Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉन कार्यालयापेक्षाही मोठ्या आणि जगातील सर्वात मोठ्या हिरे आणि दागिन्यांच्या व्यापाराचे केंद्र असलेल्या 'सुरत डायमंड बोर्स'चे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे लाकार्पणही यावेळी करण्यात आले. या उद्घाटनाला मोठ्या संख्येने देश विदेशातील लोक उपस्थित होते.

तब्बल ४२०० हिरे आणि सोने व्यावसायिकांनी एकत्र येत जागतिक दर्जाचा हा प्रकल्प साकारला आहे. उद्घाटनानंतर सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. रोड शोत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. १६० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुरत विमानतळाच्या इमारतीचेही मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विमानतळाला केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे.

Nagpur Blast : नागपूरमध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, 6 महिलांसह 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

हिरे आणि दागिन्यांच्या व्यापरासाठी सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. तर सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत १२०० देशांतर्गत प्रवाशी आणि ६०० आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असणार आहे. अधिक रहदारीच्यावेळी याची क्षमता ३००० प्रवाशांपर्यंत वाढवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply