
घोरपडी - एम्प्रेस गार्डनमध्ये फिरत असताना एखाद्या झाडाजवळ गेलात आणि हे झाड कोणते आहे असा प्रश्न पडला असेल. यापुढे मात्र या प्रश्नाचे उत्तर लगेच तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. कारण एम्प्रेस गार्डनच्या वतीने अभिनव उपक्रम राबविला आहे. येथील झाडाविषयी ‘क्यूआर कोड’ विकसीत केला आहे. या ‘क्यूआर’ कोडच्या माध्यमातून म्हणजेच झाडेच स्वतः ची माहिती देऊ लागली आहेत. झाडांवर चिटकवलेले क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करताच झाडांबद्दलची संपूर्ण माहिती मोबाईल दिसत आहे. गार्डन मध्ये झाडांच्या आणि वेलीच्या विविध प्रजाती आहेत. त्यामुळे बहुतांश जणांना या प्रजातीची माहिती नसते. हे झाड व वेल कोणत्या प्रकारची आहे. हे आपल्याला सहजासहजी ओळखता यावे, त्याची माहिती अवगत व्हावी, या उद्देशाने क्यू आर कोड या झाडांना बसविण्यात आले आहेत.
यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. यासाठी पर्यावरण तज्ञ डॉ श्रीनाथ कवडे यांनी बेळगांवच्या जीएसएस कॉलेजचे प्राध्यापक डॉ प्रविण पाटील यांनी मदतीने वेबसाईट तयार केली आहे. जवळपास तीनशे वेगवेगळ्या प्रजातीची झाडे व वेली येथे असून ८५० झाडांना क्यू आर कोड लावविण्यात आले आहेत. यामुळे झाडांची मराठी इंग्लिश अशी दोन्ही नावे व माहिती लोकांना सहज उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाचे २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुष्पप्रदर्शनमध्ये उदघाटन होणार आहे.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने तो कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. मात्र जर त्याला जर त्या झाडाचे नाव माहिती नसेल तर ते काय नावाने सर्च करणार असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे थेट क्युआर कोड स्कॅन करुन तेथेच त्या झाडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. याचा सर्वांनाच फायदा होणार आहे.
- सुरेश पिंगळे, सचिव, एम्प्रेस गार्डन
या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रजातीच्या वेली व झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. त्यामुळे विविध प्रजातींची झाडे मोबाइलद्वारे ओळखता येऊ शकणार आहे. प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती प्रत्येकांना यापुढे उपलब्ध होणार आहे.
- श्रीनाथ कवडे, पर्यावरण तज्ञ
एम्प्रेस गार्डन मध्ये अनेक दुर्मिळ वेली व झाडे असल्याने अनेक वेळा येथे आलेल्या लोकांना त्या झाडांची माहिती मिळण्यास अडचणी येत होत्या. आम्ही क्यूआर कोड द्वारे ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली असून यांचा आनंद आहे. येथील सर्व झाडांची मोजणी झालेली असून भविष्यात जिओ टॅगिंग करणार आहोत, यामुळे झाडांचे संवर्धन करण्यास मदत होईल.
एम्प्रेस गार्डनमध्ये हजारों झाडे आहेत. यामधील अतिशय दुर्मिळ झाडे व वेली यांची माहिती क्यूआर कोडच्या द्वारे उपलब्ध झाली आहे. त्यापैकी काही झाडे व वेली पुढील प्रमाणे -
मोठ्या संख्येने उपलब्ध असलेली झाडे
-
टेंभुर्णी ५८
-
आंबा ८५
-
मोहोगनी ५४
-
चिंच ४४
-
पुत्रंजीवा ३३
-
भेरली माड ४३
-
गोलदार २५
-
जंगली बदाम११
-
वाव्हळ १६
-
बॉटल पाम २८
-
सीता अशोक ११
-
रोहितक १२
दुर्मिळ
-
कुसूम १
-
ऐन १
-
पतंगवेल १
-
कांचन वेल २
-
ताडगोळा ४
-
कळंब १
-
गोरखचिंच ३
-
धावडा ३
-
कदंब २
-
लकुच ५
-
काटेसावर ४
-
आॅस्टेलियन चेस्ट नट १
-
कोलव्हिलिया ४
-
दिवीदिवी १
-
गारंबीचा वेल १
-
वड १०
-
मधुमालती वेल ५
-
दक्षिणी मोह ८
-
रूद्राक्ष २
-
सुरंगी १
-
जांभुळ ९
-
कृष्णवड १
-
सोन चाफा ३
-
शिकेकाई वेल १
-
किनई -पांढरा शिरिष ७
-
विदेशी झाडं
-
पर्जनवृक्ष ३६
-
पिचकारी २५
-
गुलमोहर १५
-
जायंट बांबू बेट १
-
कॉपर पॉड १३
-
पॉलिएलथिया १३ (अशोक)
-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
