सुनेत्रा पवार, अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी विलीनीकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
NCP Merger Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा पोपट मेलाय का? असा प्रश्न राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही पडला आहे. कारण काही बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर या विषयावर बडे नेते भाष्य करण्याचे टाळत असल्याचे अथवा चेंडू टोलवण्याची कसरत करताना दिसत आहेत. सद्या अजितदादांच्या विमान अपघातावरून संशयाचे धुके गडद झाले आहे. त्यात 27 जानेवारी 2026 रोजीच्या घडामोडींकडे अंगुली निर्देश करत आमदार रोहित पवार काहीतरी इंगित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांनी अजूनही कुणाचे थेट नाव घेतलेले नाही. या ताज्या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीत नाराजी नाट्य तर सुरू नाही ना याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्याचे सध्या तरी समोर येत आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत टोलवाटोलवी
अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी हालचाली केल्या, असा दावा करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. त्यानंतर या 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला. तर दुसरीकडे अजितदादा गटातील बड्या नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले. दादांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती दिली नाही, असा त्यांचा दावा आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
विलीनीकरणाविषयी कुणाची नाराजी?
राष्ट्रवादी पक्षात विलीनीकरणाविषयी कुणाची नाराजी आहे याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते याविषयी नाखूष असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून तरी समोर येत आहे. विलीनीकरणाचा चेंडू या कोर्टातून त्या कोर्टात टोलावल्या जात आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सोमवारी बोलणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. अजितदादांच्या गटातील काही नेत्यांना विलीनीकरणानंतर सत्तेत वाटा द्यावा लागणार असल्याने ते एकत्रिकरणाच्या विरोधात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवार मौन कधी सोडणार?
तर या सर्व घटनाक्रमात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार या अद्यापही मौन बाळगून आहेत. त्यांनी विलीनीकरण आणि इतर मुद्यांवर अद्याप मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य अद्याप केलेले नाही. तर अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी सुद्धा या विषयावर पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अपडेट सध्या तरी समोर आलेली नाही. सुनेत्रा पवार याविषयीवर मत मांडतील त्यावेळी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल.
[embedded content]
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



