
Solapur Crime : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका शिक्षकाने पत्नीसह मुलाचा निर्घृण खून करून स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोलापूरच्या बार्शी शहरात ही हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अतुल मुंडे असे पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे दोघेही मुंडे पती-पत्नी हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, अतुल मुंडे यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. तर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एका शिक्षकाने कुटुंबातील सदस्यांची हत्या करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. तर त्यांच्या पत्नी देखील शिक्षका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, अतुल मुंडे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. परंतु, सर्वच बाजूने या घटनेचा तपास करत आहे.
|
|
नेमकं काय घडलं?
बार्शीत घडलेल्या घटनेत अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) ओम सुमंत मुंडे (वय 5) या तिघांचा मृत्यू झालंय. प्राथमिक माहितीनुसार, अतुल मुंडे यांनी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेतं आत्महत्या केली. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. अतुल मुंडे यांनी हे कृत्य का केलं याबाबतीत पोलीस तपास करीत आहेत.
परिसरात खळबळ...
शिक्षक मुंडे दांपत्य मागील काही वर्षांपासून बार्शी शहरात राहत होते. मात्र, आज अतुल मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, पोलीस देखील घटनास्थळी पोहचले आहेत. सोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आले आहेत. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. पोलीस आता सर्वच बाजूने तपास करत आहेत.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




