Solapur Breaking News : सोलापुरात काँग्रेसला धक्का; आमदार प्रणिती शिंदेंचा खंदा समर्थक भाजपात

Solapur Breaking News :सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा आमदार प्रणिती शिंदे  यांचे खंदे समर्थक मेघनाथ येमुल यांनी भाजपॅट प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला.

मेघनाथ यमूल यांच्या भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेशामुळे या भागात आता भाजप मजबूत झाल्याचे मानण्यात येत आहे. मात्र सोलापूर शहरात यमूल यांच्या जाण्याने कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून मेघनाथ येमुल यांची ओळख आहे. 

Congress Foundation Day : तब्बल 100 वर्षानंतर नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन; लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार

दोन निवडणुकीत भाजपचा केला होता पराभव 
येमुल यांनी सलग दोन महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभवाची धुळ चारली होती. मात्र मागच्या महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून येमुल यांचा निसटता पराभव झाला होता. आता मेघनाथ येमुल यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला सोलापूर पूर्व विभागात मोठा फटका बसण्याची शक्यता असून महापालिका निवडणुकीत समीकरण बदलणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply