Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Pune Solapur Highway Accident : सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चार महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधीलअपघातग्रस्त महिला भाविक रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, कार मोहोळ तालुक्यातील यावलीजवळ आली असता, बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Chandrayaan-3 : विज्ञानाच्या यशासाठी देवाकडे साकडं! चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व धर्मांची प्रार्थना

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटली नसून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. अपघातामधील मृत हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकतवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply