गाझियाबाद : रेल्वे रुळावर रिल्स बनवनं पडलं महागात; एक्स्प्रेसच्या धडकेत मुलीसह तिघांचा मृत्यू

गाझियाबाद : गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन हद्दीत कल्लू गढी रेल्वे रुळावर उभं राहून रिल्स (Reels) बनवत असलेल्या तरुणीचा आणि दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

देहात झोनचे डीसीपी डॉ. इराज राजा यांनी सांगितलं की, कल्लू गढी रेल्वे रुळावर एक तरुणी आणि दोन तरुण रिल्स बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर पद्मावत एक्स्प्रेसच्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तरुणीचं वय 22 ते 25 च्या आसपास असून दोन्ही तरुणांचं वय 30 ते 35 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या मृतांची ओळख पटली नाही. डीसीपी राजा यांनी सांगितलं की, 'ही रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घडली. रेल्वे स्टेशन मास्टरनं आम्हाला याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ आम्ही तिथं दाखल झाला. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आम्हाला रेल्वेकडून माहिती मिळाली की, हे तिघं तिथं व्हिडीओ बनवत होते.'



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *