नागपूर: वीजबिलात दिलासा मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करून घरांच्या छतावर रूफटॉप सोलर प्रणाली बसविणाऱ्या नागपूरकरांना आता अवाजवी वीजबिलांचा मोठा फटका बसत आहे. अनेकांना १० ते १२ हजार, तर काहींना चक्क १ लाख रुपयांहून अधिकचे बिल आल्याने सोलरधारक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अनाकलनीय कारभार मागे 'स्मार्ट मीटर'च्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे.
नेमके काय घडले?
जून महिन्यात सोलर ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजपचे विदर्भ विभागीय संघटनमंत्री राहिलेले दिवंगत अरविंद शाहपूरकर यांचे कुटुंबही या फसवणुकीचे बळी ठरले आहे. त्यांच्या पत्नी मीरा शाहपूरकर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात रहिवाशांच्या पूर्वपरवानगीशिवाय इमारतीत स्मार्ट मीटर बसविण्यात आले आणि त्यानंतर लगेच वीजबिलात मोठी वाढ झाली. मार्च महिन्यात ७८० रुपये बिल आले असताना, आता अचानक १३ हजार ५० रुपयांचे बिल आल्याने त्यांना धक्काच बसला.
सॉफ्टवेअरची चूक की मीटरचे प्रोग्रामिंग?
या वाढीव बिलांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, स्मार्ट मीटरच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा प्रोग्रामिंगमध्ये काही त्रुटी असण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या असून, मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी अधीक्षक अभियंते प्रफुल्ल लाडे आणि संजय वाकडे यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरिकांमध्ये वाढता रोष:
स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीबाबत नागपूरमध्ये आधीच असंतोष आहे. याआधीही स्मार्ट मीटरच्या वाढत्या बिलांच्या विरोधात विविध समित्यांनी आंदोलने केली आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर न बसविणे आणि वीजबिलात पारदर्शकता ठेवणे यांसारख्या मागण्या जोर धरत आहेत. आता या सॉफ्टवेअर गोंधळामुळे नागरिकांचा स्मार्ट मीटरवरील विश्वास आणखीनच डळमळीत झाला आहे. महावितरण प्रशासन आता या त्रुटी कशा सुधारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




