Shocking Incident in Pune: Doctor Assaults Elderly Patient During Treatment, Threatens Her After She Cries in Pain.

पुण्यात माणुसकीला काळीमा; उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरची मारहाण, ‘पुन्हा ओरडलीस तर पुन्हा मारीन’ अशी धमकी.

Shocking Incident in Pune: Doctor Assaults Elderly Patient During Treatment, Threatens Her After She Cries in Pain.  
पुण्यातील नन्हे (धायरी) येथील मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला डॉक्टरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घटनेचा तपशील:

तक्रारदार ६० वर्षीय महिला गुरुवारी आपल्या सूनेसोबत नन्हे येथील भुमकर चौकात असलेल्या मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या होत्या.

डॉ. मयुर शंतनुराव यादव शिंदे यांनी महिलेची प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना प्लास्टर करण्यास सुरुवात केली.प्लास्टर करताना वेदना असह्य झाल्यामुळे वृद्ध महिला मोठ्याने ओरडल्या.

 

याचा राग आल्यामुळे डॉक्टर शिंदे यांनी महिलेच्या कानाखाली मारली आणि "पुन्हा ओरडलीस तर अजून मारीन," अशी धमकी दिली.


पोलीस आणि स्थानिक कारवाई:

पीडित महिलेने या गैरवर्तणुकीविरोधात पोलिसांत धाव घेतली असून, आरोपी डॉक्टर मयुर शिंदे (वय ४०, रा. भुमकरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत डॉक्टरवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


जेव्हा या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा डॉक्टरांनी हा "ट्रेनिंगचा भाग" असल्याचे सांगत आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये अधिक संताप व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *