Shivsena : धनुष्यबाण चिन्हासंदर्भात ठाकरेंना दिलासा नाहीच; आजची सुनावणी रद्द

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे. आजची तारीख मागच्या वेळी कोर्टाने दिली होती. पण कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही. सत्तासंघर्षाच्या निकालानंतरच चिन्हाबाबत कोर्टाची पुढची भूमिका ठरण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण शिंदेंना देण्याचा जो निकाल दिला त्या विरोधात ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला वापरता येणार आहे.

एका बाजुला सत्तासंघर्षाच्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे, सोबतच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 24 एप्रिल ही तारीख मागच्या वेळी देण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाजाच्या यादीमध्ये शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणाचा समावेश नाही.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार धनुष्यबाण हे शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे. शिवसेना हे नावसुद्धा शिंदे गटालाच दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply