
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण तापलं असून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले असल्याचं देखील राऊत म्हणाले आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसात गडगडल्या शिवाय राहणार नाही.
तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा 'डेथ वॉरंट' निघालेलं आहे येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांचा पाचोरा दौरा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी ११.०० वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता ते जळगाव विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून वाहनाने पाचोराकडे रवाना होतील. यानंतर दुपारी १.३० वाजता पाचोरा शहरात वरखेडी फाटा येथून महाराणा प्रताप चौकपर्यंत मोटरसायकल रॅली काढली जाईल आणि महाराणा प्रताप चौक येथे स्वागत केले जाईल. दुपारी २.०० वा. ते ४.३० पर्यंत निर्मल सिड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि राखीव वेळ असेल.
दुपारी ४.३० वा. ते ५.३० ते निर्मल सिड्स समोरील नवीन इमारतीजवळ मोकळ्या जागी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. तसेच निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक नवीन तयार करण्यात आलेल्या लॅबचे उद्घाटन करतील. माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




