पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री.राहुल गांधी यांच्या विरोधातील बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात विशेष न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर चालू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार हे घेत आहेत.
उलट तपासा दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले की, विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होते, मात्र नंतर ते निर्दोष सुटले. तसेच सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा 'दया याचना' अर्ज केल्याचेही त्यांनी मान्य केले.
उलट तपासामध्ये सावरकरांच्या विचारसरणी विषयी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. द्विराष्ट्रवाद, 'गाय ही देवता नसून उपयुक्त पशू आहे' असे गायी विषयी सावरकरांनी केलेले भाष्य, तसेच “गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा”, “कोण हा सावरकर”, “स्वातंत्र्यवीर सावरकर की स्वातंत्र्यविरोधी सावरकर” अशा विविध टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करत असल्याची टीका केल्याचा संदर्भही देण्यात आला. तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “सावरकरांनी इंग्रजांची चाकरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहे” अशा आशयाची टीका केल्याचे माहिती नसल्याचे फिर्यादींनी सांगितले.
तसेच माजी केंद्रीय मंत्रि श्री.अरूण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत सरदार पटेल यांच्या विरोधात चिथावणीखोर भूमिका घेतल्याचा उल्लेख केल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे फिर्यादींनी न्यायालयात मान्य केले.
उलट तपासा दरम्यान सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र इतर काही विशिष्ट विचारधारेवर चालणार्या संघटनांनी अशी मागणी केली असेल, तर त्याबाबत ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, अशफाक उल्लाखान, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त आणि इतर क्रांतिकारक यांचेही मोठे योगदान असल्याचे फिर्यादींनी मान्य केले.
तसेच संसदेमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले असून तो राष्ट्रीय गौरव मानला जातो, असेही त्यांनी सांगितले. मात्र भगतसिंग, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त किंवा अशफाक उल्ला खान यांना तशा प्रकारचा गौरव का मिळाला नाही, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा, फाशी किंवा अमानुष छळ सहन करणारे सर्व क्रांतीकारक भारतरत्नास पात्र आहेत का, या प्रश्नावर “सर्व क्रांतीकारकांचा योग्य सन्मान झाला पाहिजे” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
तसेच “स्वातंत्र्यलढ्यात फाशी जाणे आणि शिक्षेमध्ये सवलत मिळवणे यामध्ये नैतिक फरक आहे का?” असा प्रश्न ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विचारला असता, “कोणाला फाशी द्यायची आणि कोणाला सवलत द्यायची हा निर्णय ब्रिटिश सरकारचा होता. त्यामुळे नैतिक फरकाबाबत मी काही भाष्य करू शकत नाही,” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, ॲड.अजिंक्य भालगरे व ॲड. सुयोग गायकवाड हे मदत करित आहेत.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे उलट तपास अपूर्ण राहिला असून पुढील सुनावणी दिनांक २५ मे २०२६ रोजी होणार आहे.
शहर
- पिंपरी-चिंचवडमध्ये निसर्गाचा खजिना! कोळ्यांच्या ४ नवीन प्रजातींचा शोध; 'मोगरा' कोळ्यासह दुर्मीळ प्रजातींनी शास्त्रज्ञ भारावले
- पुण्याचं वैभव वाढणार! लोहगाव विमानतळाजवळ ४८ एकरात उभारणार भव्य 'भारत मंडपम'; पुणे महानगरपालिकेची मोठी मंजुरी
- 'मिसिंग लिंक'वर फोटो काढण्यासाठी थांबलात तर खिसा होणार रिकामा; दोन दिवसांत ९० वाहनांवर दणक्यात कारवाई
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
महाराष्ट्र
- लातूर हादरलं! नराधम बापानेच दिव्यांग अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; जळकोट तालुक्यातील संतापजनक घटना
- पिंपरी-चिंचवडमध्ये निसर्गाचा खजिना! कोळ्यांच्या ४ नवीन प्रजातींचा शोध; 'मोगरा' कोळ्यासह दुर्मीळ प्रजातींनी शास्त्रज्ञ भारावले
- पुण्याचं वैभव वाढणार! लोहगाव विमानतळाजवळ ४८ एकरात उभारणार भव्य 'भारत मंडपम'; पुणे महानगरपालिकेची मोठी मंजुरी
- सोलापूर जिल्हा रक्ताळला! ४ महिन्यांत २८ खून; जमिनीचा वाद आणि अनैतिक संबंधांतून हत्यांचे सत्र; ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली
गुन्हा
- सोलापूर जिल्हा रक्ताळला! ४ महिन्यांत २८ खून; जमिनीचा वाद आणि अनैतिक संबंधांतून हत्यांचे सत्र; ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
- बीडमध्ये धक्कादायक 'दृश्यम' स्टाईल मर्डर! पत्नीनेच बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने केला पतीचा खून; ८ महिन्यांनंतर गोदावरी पात्रात सापडला सांगाडा
- हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून रस्ते अपघाताची एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे
राजकीय
- पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान: ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीत नवा ट्विस्ट; तज्ज्ञांनी वर्तवला 'सायलेंट व्होटर्स'चा अंदाज
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?






















Subscribe to my channel





https://shorturl.fm/eRsC1