मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि गंभीर दरोड्याची घटना घडली. चालत्या वाहनाचे टायर पंक्चर करून प्रवाशांना बेदम मारहाण करत सुमारे १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महामार्गावरील या वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एका वकिलाचे कुटुंब समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना मलढोण शिवाराजवळ त्यांच्या कारचे टायर अचानक पंक्चर झाले. टायर बदलण्यासाठी त्यांनी आपले वाहन महामार्गावर थांबवले. याच संधीचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या तब्बल ११ ते १२ जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने अंधाराचा लाभ घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी वाहनचालक आणि प्रवाशांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबारही करण्यात आला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यादरम्यान दरोडेखोरांनी प्रवाशांच्या ताब्यातील सुमारे २७.८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळकावला. दरोडा टाकल्यानंतर मारेकऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची नाकाबंदी करत कसून शोधमोहीम सुरू केली आहे. समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अशा धाडसी चोऱ्या आणि दरोड्यांमुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलिसांनी लवकरात लवकर या कुख्यात टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी केली जात आहे.
शहर
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
- मुंबई: महापालिकेचा मोठा पर्यावरणपूरक निर्णय; गणपती विसर्जन झाल्यानंतर मुलूंडमध्ये पीओपीच्या मूर्तींवर केली जाणार पूर्णप्रक्रिया
महाराष्ट्र
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उंब्रजच्या पुलावर चालत्या उभ्या टेंपोला अचानक भीषण आग; नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!

























Subscribe to my channel




