ब्लॅक बॉक्सवरून रोहित पवार यांचा रोखठोक सवालImage Credit source: TV9
राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा बारामतीजवळ विमान अपघात झाला. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यांच जाणं अख्ख्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक होतं. पवार कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेला आता जवळपास 3 आठवडे उलटून गेले असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशय, अशी शंका अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून ते या मुद्यावर सातत्याने भाष्य करत असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई, दिल्लीत पत्रकार परिषद घेून अपघाताच्या आदल्या दिवशीचा संपूर्ण घटना क्रम मांडला. तसेच काही पुरावेही दिले. याप्रकरणी लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही पुढले मुद्देही मांडले. विमानातील इंधन, ब्लॅक बॉक्स याबद्दलही सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. ब्लॅक बॉक्स, व्हॉईस रेकॉर्डरचं थोडं नुकसान झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. याच मुद्यावरून आता रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ब्लॅक बॉक्स कसा जळाला ?
अजित पवार यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यातील 5 जणांचेही मृतदेह बरेच होरपळले होते. मात्र विमान जिथे कोसळलं, त्याच्या आजूबाजूला काही कागदपत्रं पडली होती. ते कागद जराही जळाले नव्हते. याच मुद्याचा आधार घेत रोहित पवारांनी रोखठोक प्रश्न विचारले आहेत.
विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर 1100 डिग्री सेल्सिअस असताना, तिथे 1 तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडलं तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
आणि विमानाची बॉडी पाहिली तर त्याच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हा जो प्रचार सुरू होता, जे सांगण्यात येतंय ते केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. जर तिथले पेपर जळाले नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? असा रोखठोक सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. आत्तापर्यंत इतर देशातही असेच अपघात झाले, तिथेही अशीच सेम आग लागली. त्या आगीची तीव्रताही तितकी सेम होती. अगदी सेम घटना होती. तरीही तिथे ( त्या विमानाच्या अपघातस्थळी) ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


