Pune Unseasonal Rain : अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Pune Unseasonal Rain : पुणे शहराला कालपासून वादळी वाऱ्यासहअवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, घरे पडल्याच्या मोठ्या दुर्घटनाही समोर आल्या आहेत. शहरातील दांडेकर पुलावर झाड कोसळून पाच घरे जमिनदोस्त झाली असून एका चिमुकलीसह दांपत्य जखमी झाल्याची घटना समोर घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात दांडेकर पूल येथे औदुंबराचे झाड उन्मळून पडल्याने पाच घरे जमीन दोस्त झाली. या दुर्घटनेत ज्येष्ठ दाम्पत्यासह चार वर्षाची चिमुरडी ही जखमी झाली आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दत्तवाडी परिसरात सुखानंद सोसायटी असून येथे हे झाड आहे.

Pune News : काळवाडी येथे आठवा बिबट्या जेरबंद

सायंकाळी सुरू झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे किमान 25-30 वर्षे जुने असलेले हे झाड कोसळले. सोसायटीची सीमा भिंत फोडून पलीकडे असलेल्या पाच घरांवर हे झाड कोसळले. यामध्ये तेली कुटुंबाची तीन घरी होती तर खुडे कुटुंबाचे एक घर होते. सोबतच नरवीर तानाजी मंडळाची एक खोली या ठिकाणी होती.अशा पाच घरांवर हे झाड कोसळले.

वसंत तेली (वय 65), वासंती तेली (वय 60), सलोनी अतुल खुडे (वय ४) असे तिघे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वादळ वाऱ्याच्या पावसाने लोणीकंदजवळ शेतकऱ्याच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply