Pune News : काळवाडी येथे आठवा बिबट्या जेरबंद

Pune News : काळवाडी(ता.जुन्नर)येथील शेतकरी रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी(ता.२०) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

सदर बिबट आठ वर्षीय मादी असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.काळवाडी येथे रुद्र फापाळे या आठ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.या घटने नंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते यापुर्वी काळवाडी येथील पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते.

Pune Accident : पुण्यात भरधाव वेगाचे दोन बळी; पब फक्त नावालाच बंद, रात्रीचा धिंगाणा सुरुच, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!

तसेच पिंपळवंडी,पिंपरी पेंढार व काळवाडी या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात आता एकुण आठ बिबटे जेरबंद झालेले आहेत.सदर बिबट मादीला

बिबट कृती शीघ्र दलाचे वन कर्मचारी रवी काळे,ऋषिकेश गायकवाड,सोमनाथ भालेराव, रोशन नवले,रोहित बोडके, रेस्क्यु टीम सदस्य बाबाजी खर्गे व वनपाल संतोष साळुंके,वनसेवक बी.के खर्गे यांनी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *