Toll : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहनांना टोलमाफी हवी; नागरिकांची मागणी

Toll : सिंहगड रस्ता - भोर फाट्यापर्यंत जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांकडून खेड शिवापूर येथे टोल न घेता मोफत जाऊ द्यावे. २५ किलोमीटरसाठी ८० किलोमीटरचा टोल आकारू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे होणे आवश्यक आहे. येथे एम. एच. १२, एम. एच. १४ परवाना असलेल्या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

 

सवलत न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेनकर यांच्यासह टोलनाका हटाव कृती समितीचे माऊली दारवटकर, ‘आप’चे पुणे शहर युवक अध्यक्ष अमित मस्के, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, सचिव प्रभाकर कोंढाळकर, शंकर थोरात, प्रशांत कांबळे आदींनी दिला.

दरम्यान, टोल माफ करण्याबाबत कोणतेही निर्देश अथवा सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. २० किलोमीटरच्या परिघात ३३० रुपयांत स्थानिक पास देण्यात येतो. येथील नागरिकांनी मासिक पास काढून घ्यावेत, असे आवाहन पुणे टोल रोड प्रा. लि.चे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply