
पुणे : दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून त्यांना उत्तीर्ण असल्याची बनावट प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल आणि हिंद युनिर्व्हसिटी नावाने बनावट संकेतस्थळ सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी कृष्णा सोनाजी गिरी, सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी तोतया विद्यार्थ्याच्या माध्यमातून संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावीच्या प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यानंतर पहिला हप्ता म्हणून कांबळेला ३९ हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम घेण्यासाठी कांबळेला पुण्यात बोलाविण्यात आले. स्वारगेट भागात त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यस्थ (एजंट) नेमल्याची माहिती मिळाली.
ज्या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्र तातडीने हवे आहे, अशा विद्यार्थ्यांशी कांबळे आणि मध्यस्थ संपर्क साधत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नोकरी मिळवणे तसेच शासकीय कामासाठी दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने अनेकांना या टोळीने गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel



