Pune : आनंद राठी वेल्थ कंपनीत लैंगिक छळ प्रकरण CEO राकेश रावलसह पाच उच्चाधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Pune : पुणे शहरातील नामांकित वित्तीय संस्था आनंद राठी वेल्थमध्ये कार्यरत ३३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राकेश रावल, कार्यकारी संचालक स्वप्न चक्रवर्ती, सह मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज, एचआर प्रमुख तेजल शहा आणि कार्यकारी संचालक सोनाली रावल यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कंपनीतील एका कार्यकारी संचालकाने (स्वप्न चक्रवर्ती) तिच्याशी लगट केली, विनयभंग केला आणि तिचा पाठलाग करून सतत छळ केला. तक्रार केल्यास कंपनीतून काढून टाकण्याची धमकी दिली. याबाबत तिने कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. उलट सूडबुद्धीने तिची दुबईतील कार्यालयात बदली करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकी देण्याच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या आरोपींपैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कंपनीची भूमिका :
आनंद राठी वेल्थ कंपनीतर्फे एचआर प्रमुख तेजल शहा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “व्यवस्थापनाने सुरुवातीच्या टप्प्यातच संबंधित कर्मचाऱ्याला पीओएसएच (POSH) फ्रेमवर्कनुसार अंतर्गत समितीमार्फत तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही आणि त्याऐवजी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. आवश्यक चौकशी नंतर मुंबई पोलिसांनी २४ मार्च २०२६ रोजी हा विषय बंद केला होता.”

या प्रकरणाने कॉर्पोरेट क्षेत्रातील लैंगिक छळ आणि POSH कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस अधिक तपास करत असून, लवकरात लवकर आरोपींना समन्स बजावण्याची शक्यता आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : आनंद राठी वेल्थ कंपनीत लैंगिक छळ प्रकरण CEO राकेश रावलसह पाच उच्चाधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply to Jeannette408 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *