Pune : महात्मा फुले चौकातील कोंडी कमी करण्यासाठी ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाला मंजुरी; 24 महिन्यांत काम पूर्ण

Pune : अत्यंत वर्दळीच्या व सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या मुंढवा, केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावरील महात्मा फुले चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावरून वाहने, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. यासाठी १२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

या उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुलामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी बायपास परिसरातील सततची कोंडी दूर होईल. येथील प्रवास वेगवान होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पांचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्याचा कालावधी वगळून २४ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, असे भिमाले म्हणाले.

मेट्रोच्या विस्तारालाही मान्यता
‘मेट्रोला पुणेकरांची पसंती मिळत असून, मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुंढवा, केशवनगर ते खराडी मार्गावरही मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे महामेट्रोशी चर्चा करून या पुलात मेट्रोचाही अंतर्भाव केल्याचे भिमाले यांनी सांगितले. उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी आदीसह तडजोडीने १२६ कोटी ६३ लाख ३६,१०३ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. नळस्टॉप येथील पुलाच्या धर्तीवर हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल असेल. पहिल्या स्तरावरून वाहने, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावेल, असे प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.

काळेबोराटेनगरला भुयारी पादचारी मार्ग
हडपसर-काळेबोराटेनगर रस्त्यावरील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर काळेबोराटेनगर येथे पादचारी भुयारी मार्ग बांधण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वे विभागामार्फत होणाऱ्या या कामासाठी तब्बल पाच कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार असून, हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाईल. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

हडपसर आणि काळेबोराटेनगर येथील रेल्वे गेट पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आहे. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या धावतात. त्यामुळे अनेकदा रेल्वे गेट बंद ठेवावे लागते. यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा म्हणून पादचारी पूल बांधण्याची मागणी जोर धरत होती. महापालिकेने या पर्यायाची चाचपणी केली होती. मात्र, हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे लक्षात आल्याने पादचारी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला आहे. रेल्वे विभागामार्फत हा भुयारी मार्ग उभारला जाईल. या कामासाठी पाच कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : महात्मा फुले चौकातील कोंडी कमी करण्यासाठी ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाला मंजुरी; 24 महिन्यांत काम पूर्ण

Leave a Reply to Briana56 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *