
Pune : प्रजासत्ताक दिनाला लागून सलग सुट्ट्या मिळत आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले नागरिक गावी अथवा पर्यटनाला जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या काळात प्रवाशांची गर्दी होते. याच संधीचा फायदा घेऊन खासगी बसचालकांनी शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांची तिकिटे दुप्पट केली आहेत. पुण्यातून मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देशात जाणाऱ्या खासगी बसचे तिकीट दर वाढवले. आहेत. रेल्वेचे बुकिंग दोन महिने फुल्ल असल्याने ऐन वेळी रेल्वेला तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रजासत्ताक दिनाला लागून सलग सुट्ट्या आल्यामुळे देशांतर्गत विमान प्रवासाला मोठी मागणी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दिवसातील विमान तिकीट दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे खासगी बसचालकांनी (ट्रॅव्हल्स) तिकीट दर वाढवले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी अथवा गावी निघालेल्या प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.
|
|
प्रजासत्ताक दिनाच्या सुटीसह शनिवार ते सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी आहे. प्रजासत्ताक दिनाला संचलन पाहण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर शनिवार, रविवारी दुप्पट झाले आहेत. मुंबई-दिल्ली, पुणे-बेंगळुरू, मुंबई-गोवा, पुणे-कोलकाता अशा मार्गांवर विमानतिकिटांचे दर सर्वाधिक झाले आहेत. इतर दिवशी चार ते सहा हजार रुपयांत मिळणारी तिकिटे या कालावधीत 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. महत्त्वाच्या वेळांच्या फ्लाइटसाठी तर दर आणखी जास्त वाढले आहेत.
दरवाढीमुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेकडे मोर्चा वळवला असून, काहींनी प्रवासाची तारीख बदलली आहे. मात्र, सुट्टीचा कालावधी मर्यादित असल्याने अनेक जण वाढीव तिकीट दर मोजून प्रवास करणार आहेत. विमान कंपन्यांकडून ही दरवाढ हंगामी आणि मागणीवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. सुट्टीपूर्वी किमान दोन ते तीन आठवडे आधी बुकिंग केल्यास तुलनेने स्वस्त दर मिळू शकतात; परंतु ऐन वेळी जाणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


1 thought on “Pune : सलग सुट्ट्यांचा गैरफायदा! खासगी बस चालकांकडून तिकीट दरात दुप्पट वाढ; प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ”