
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
गाडीवरुन जाताना आयशरची भीषण धडक
ऋतुजा पांडुरंग शिंदे आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेहा आणि ऋतुजा या दोघी दुचाकीवरून प्रवास करत होत्या. तेवढ्यात काळेवाडी परिसरात भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झालेला होता. रुग्णालयात उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्या दोघींना तपासून मृत घोषित केले.
|
Pune : पुण्यात भीषण अपघात; दोन वाहनांची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू, पुणे हळहळलं |
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करुन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक जितेंद्र निराले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मकर संक्रांती हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, याच पवित्र सणाच्या दिवशी दोन बहिणींवर मृत्यूने झडप घातल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
एकाच घरातील दोन मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. हे पाहून साऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


1 thought on “Pune : पुण्यात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; मकर संक्रांतीला शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर”