
पुणे : मुंबईप्रमाणेच पुण्यातही २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना मोफत, तर त्यानंतरच्या म्हणजे २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना आता अडीच लाख रुपयांत घर (सदनिका) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना आहे त्याच ठिकाणी घरे मिळण्यास मदत होणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) राज्य सरकारला सुधारित बांधकाम नियमावली सादर केली आहे. या नियमावलीत अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांनादेखील पुनर्वसन योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सशुल्क पुनर्वसन करण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये २००० सालापर्यंतच्या झोपडीधारकांचे मोफत पुनर्वसन करण्याची तरतूद आहे. परंतु त्यानंतरच्या झोपडीधारकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
हा पुरावा लागणार...
पुनर्वसनास पात्र नाहीत, अशा झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचे सशुल्क पुनर्वसन करण्याची तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. त्यासाठी रेडी-रेकनरमधील बांधकाम खर्चाच्या दरात त्यांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी झोपडीधारक २०११ पूर्वीचा रहिवासी असल्याचा पुरावा त्याच्याकडे असावा, असे बंधन घालण्यात आले होते.
आकडे बोलतात
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून जवळपास ५८० हून अधिक झोपडपट्ट्या या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे १२ लाख झोपडीधारक त्यापैकी वीस ते पंचवीस टक्के झोपडीधारक हे २००० नंतरचे रहिवासी आहेत.
काय आहे स्थिती?
-
पुणे शहरात काही झोपडीपट्ट्यांमध्ये पात्र झोपडीधारकांपेक्षा अपात्र झोपडीधारकांची संख्या अधिक आहे.
-
अशा झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येत.
-
अपात्र झोपडीधारकांना त्याच ठिकाणी सदनिका घ्यावयाची असेल, तर बांधकाम खर्चाच्या दराने घ्यावी लागत असल्यामुळे सदनिकांचे दर नऊ ते दहा लाख रुपयांपर्यंत जात होते. त्यामुळे त्यालाही कमी प्रतिसाद मिळत होता.
-
मध्यंतरी २००० नंतरच्या आणि २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
-
मात्र हा निर्णय केवळ मुंबई पुरता लागू होता. आता तो पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातसुद्धा लागू करावा, अशी शिफारस प्राधिकरणाने राज्य सरकारकडे केली होती.
-
राज्य सरकारने त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या सुधारित बांधकाम नियमावलीत या तरतुदीची शिफारसही करण्यात आली आहे.
२००० नंतरच्या आणि २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना यापूर्वी बांधकाम खर्चाच्या दराने सदनिका विकत घ्यावी लागत होती. त्यांना आता अडीच लाख रुपयांत ती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनादेखील गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
- नीलेश गटणे, सीईओ, एसआरए
-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




