
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती अखेर तुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, शिंदेंच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खासदार बारणे म्हणाले की, शहराध्यक्ष व प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत शिवसेनेकडून भाजपसमोर 29 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र भाजपकडून हा आकडा आधी 16, त्यानंतर 13 आणि अखेरीस 10 जागांपर्यंत आणण्यात आला. थेट 29 वरून 10 जागांवर येण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याने युतीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
|
|
तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपकडून विरोध होता, अशीही चर्चा आहे. यामुळे भाजप–शिवसेना युतीबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती, असेही बोलले जात आहे.
युती तुटल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत होणार आहे. भाजप, शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असली तरी राज्य पातळीवर पारंपरिक युती कायम राहील, असेही खासदार बारणे यांनी सांगितलं.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. त्यामुळे शहरात भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती निश्चित असल्याचे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेला अपेक्षित तेवढे गांभीर्याने घेतले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.
2017 च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने जागावाटपात सावध भूमिका घेतली. शिवसेना शिंदे गटाकडून 29 जागांची मागणी करण्यात आली होती; मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळत त्यांना केवळ दहा जागा देण्याची तयारी दर्शवली होती.
भाजपकडून करण्यात आलेले हे जागावाटप शिंदे गटाला मान्य नसल्याने अखेर भाजप–शिवसेना युती तुटल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आगामी महानगरपालिका निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


