
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून “सव्वाशे पार”चा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक प्रत्युत्तर देत भाजपवर थेट ईव्हीएम हॅक संबंधी आरोप केला आहे. भाजपचे आमदार तथा प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सव्वाशेहून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. पक्षात बंडखोरी होणार नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उद्या (रविवारी) भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे.
या वक्तव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जोरदार पलटवार केला. “भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही. भाजपला १०० जागा मिळवणंही कठीण आहे. भाजपने सव्वाशे पार केल्यास मी राजकारण सोडेन,” असा थेट दावा बहल यांनी केला.
|
Pune : महापालिकेच्या मैदानात आंदेकर फॅमिलीची एन्ट्री; अर्ज भरताना बंडू आंदेकर भावुक, VIDEO व्हायरल |
भाजप सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून पक्षात येणाऱ्या लोकांना ‘मशिनमधून आपोआप दोन ते अडीच हजार मते मिळतील’ असा विश्वास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, तेच भाजपमध्ये गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल,” असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला.
एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगण्याची चिन्हं असून, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का? याबाबत अद्याप अनिश्चितताच कायम आहे.
"आता त्यांनी ईव्हीएम सेट केलंय का? हे त्यांनाच माहिती. पण ते 125 जागा पार करणार म्हणतात. माझं त्यांना आताच आव्हान आहे. त्यांनी 125 जागा पार केल्या तर कायमचं राजकारण सोडून टाकू. 125 काय 100 जागा मिळवणंही त्यांना अवघड जाईल. एवढं सोपं काम थोडी आहे. निकालच दाखवले आणि जनता दाखवेल काय होणार आहे. वास्तविक पाहता ते फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. त्यामध्ये ते लोकांना असं सांगत आहेत की, मशीनमध्ये दोन-अडीच हजार मते आपोआप मिळतील, बाकीची सगळी मदत करु, तुम्ही आमच्याकडे या. असं सगळं सुरु आहे", असा धक्कादायक दावा योगेश बहल यांनी केला.
"जी लोकं आम्हाला सोडून गेली आहेत त्यांना स्वत:वर विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की, आपण राष्ट्रवादीकडून निवडून येऊ शकत नाही. अजित दादा यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जावून काय साध्य करणार? जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही", असा पलटवार योगेश बहल यांनी भाजपवर केला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

