Pune : शेड काढले, पुन्हा उभे केले; कारवाईला न जुमानणाऱ्या १२ हॉटेलांवर गुन्हे दाखल

Pune : महापालिकेने बुधवारी ४० ठिकाणी रूफटॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटच्या अवैध बांधकामावर कारवाई केली. त्यानंतर त्यातील काही ठिकाणी शुक्रवारी पुन्हा शेड उभे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

त्यामुळे महापालिकेने हॉटेलमालकांच्या विरोधात कडक भूमिका घेत गुन्हे दाखल करण्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२ हॉटेल आणि पबवर गुन्हा दाखल केला आहे, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.

शहरात अनेक हॉटेल, बार, पबसाठी अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत होती; पण कल्याणीनगरच्या घटनेनंतर महापालिकेने कारवाई करत बेकायदा पब, बार, रूफटॉप हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे.

Pune Car Accident : मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

वारंवार कारवाई करूनही हॉटेलमालक पुन्हा बांधकाम आणि शेड उभे करत आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल केलेल्या हॉटेलांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवून त्यांचे दारूविक्रीचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे मुजोरीला आळा बसणार आहे.

दरम्यान कर्वे रस्ता, नळ स्टॉप भागात फ्रंट व साइड मार्जिनमध्ये टेबल टाकून व्यवसाय करणाऱ्या १९ हॉटेलवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. त्यात एका खानावळीचाही समावेश आहे. मात्र बाणेर, बावधन, बालेवाडी, कोथरूड, आपटे रस्ता, डेक्कन परिसरातील रूफटॉप हॉटेलवर अद्याप कारवाई केलेली नाही.

यापूर्वी महापालिकेने ज्या हॉटेलवर कारवाई करून शेड काढले होते, तेथे पुन्हा शेड उभे केले आहेत. त्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९४९चे कलम ५३नुसार नोटीस बजावून कारवाई करण्यात आली.

पुन्हा शेड उभे केल्याने कलम ५२नुसार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मुंढव्यातील वॉटर्स, ओरिला, अनवाइड, हिंगोणे, कार्निव्हल, बॉटल स्पॉट, मासा, चिलीज, घोरपडीतील क्यू बार, पेटाहाऊ, स्पाइस फॅक्टरी व आकारी अशा १२ हॉटेलवर गुन्हे दाखल केले आहेत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply