
Pune-Latur-Pune Railway : पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गिफ्ट दिलं आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे.
कोच उपलब्धता झाल्याने महत्वाचा निर्णय
लातूरमार्गे जाणाऱ्या गाड्यांना कायम गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरु केली जात नव्हती. आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना दिलासा
पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत आणि हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरुन सकाळी सुटते. या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
मुख्यालयाच्या परवानगीची प्रतिक्षा
ही रेल्वे सुरु होण्यासाठी आता मुख्यालयाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे. मुख्यालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ही रेल्वे सुरु होणार आहे. पुण्यातून सकाळी सात वाजता ही रेल्वे लातूरसाठी रवाना होणार आहे आणि दुपारी एक वाजता ही रेल्वे लातूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजता हीच रेल्वे लातूरहून पुण्यासाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सुरु झाली तर अनेक प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासोबतच पुणे-लातूर रेल्वे सेवा सुरु झाल्यास सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा..
या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणि या मार्गावरील रेल्वेत होत असणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहेत. या मार्गावर महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांचादेखील समावेश आहे. त्यात सोलापूर, उस्मानाबाद या शहरांचा समावेश आहे. ही रेल्वे सुरु झाल्यास या शहरातील प्रवाशांना देखील यातून प्रवास करता येणार आहे. शिवाय गर्दीचा सामनाही करावा लागणार नाही.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


