Pune Crime News : पुणे पुन्हा हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घराला कुलूप लावून गेला पळून

Pune Crime : शरद मोहळ हत्येनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशात पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे.

Nandurbar Crime : धक्कादायक! दुचाकीने बाहेर गेला, पुन्हा घरी परतलाच नाही; ४२ दिवसांनी युवकाचा मृतदेहच सापडला

गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊनये म्हणून घराला कुलूप लावून त्याने तेथून पळ काढला. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply