
Pune Crime | Pune : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्य हादरले असतानाच आता पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघड झाला असून महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
चांडोली येथील शिवदत्त आश्रमात नवनाथ गवळी हा स्वतःला महाराज म्हणून सादर करत होता. ‘दोष निवारण’ करण्याच्या नावाखाली महिलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. ३४ वर्षीय पीडित महिलेने खेड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात जात होती. १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच ‘अंगातील दोष दूर करायचे असतील तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील’ अशी घृणास्पद मागणीही केल्याचा आरोप आहे.
कुटुंबाच्या भीतीपोटी महिला काही काळ गप्प राहिली. मात्र, आरोपीकडून सतत फोनद्वारे त्रास होत असल्याने आणि खरात प्रकरण समोर आल्यानंतर तिने धैर्याने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आश्रमात महिलांच्या अंगात ‘शक्ती येते’ असा आभास निर्माण करून त्यांच्यावर मानसिक ताबा मिळवला जात होता आणि त्यानंतर ‘दोष निवारण’च्या नावाखाली शोषण केलं जात असल्याची माहिती आहे.
खेड पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सध्या नवनाथ गवळी फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
























Subscribe to my channel




