
Pune : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. शहरात अनेकदा गँगवारच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे अनेकदा पुण्यातील गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आहे. अशा घटनांमुळे पुणे पोलिसांकडूनही गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात. चुकीचं कृत्य करणाऱ्या किंवा दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी वेळोवेळी नांग्या ठेचल्या आहेत. तसेच त्यांची धिंड देखील काढलेली बघायला मिळाली आहे. असं असलं तरी काही गुन्हेगार शांत राहताना दिसत नाही. ते सर्रासपणे शस्त्र बाळगतात. पण पोलीस अशा गुन्हेगारांविरोधात नेहमी कठोर कारवाई करतात. आतादेखील पोलिसांनी अशीच कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार दीपक चव्हाण आणि सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुल घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला. पोलीसांनी संशयित हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) असे आहे. पोलीसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच तळेगाव दाभाडे येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या आरोपीकडे मिळालेले गावठी पिस्तुल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळाले याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. ही कारवाई सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या नेतृत्वात गुन्हे तपास पथकाने केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




