
Pune : पुण्यातील संगमवाडी येथे शनिवारी दि. 17 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एक संतापजनक प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं रस्त्यावर एकच खळबळ उडाली. एका महिलेनं तरुण कारच्या बोनेटवर चढलेला असताना त्याला दोन किमीपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला चालकाची कार आणि एका इनोव्हा चालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणावर गेला आणि अखेर तरुणावर जीव धोक्यात घालणारा प्रसंग ओढवला.
गाडी रस्त्यात लावली
पुण्यातील कल्याणीनगरकडून संगमवाडीच्या दिशेने येताना दोन्ही वाहन चालकांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इनोव्हा चालकाने आपली गाडी रस्त्यात आडवी लावून महिलेच्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दोन्ही चालकांमध्ये शाब्दिक वाद वाढला. संतप्त झालेल्या इनोव्हा चालकाने महिलेच्या कारसमोर उभे राहून तिला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
|
|
वाद चिघळल्यानंतर महिलेला संताप आला आणि तिनं कार न थांबवता पुढे दामटवली. याचवेळी इनोव्हा चालक थेट कारच्या बोनेटवर झोपला. धक्कादायक बाब म्हणजे, अशा अवस्थेतही तरुण कारच्या बोनेटवर अडकलेला होता. संबंधित महिला चालकानं सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत कार चालवत नेल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान तरुण बोनेटवर लटकलेला असल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
काही अंतरानंतर महिलेनं कारचे अचानक ब्रेक लावले आणि तो तरुण रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी VIP बंदोबस्तासाठी परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, या संतापजनक घटनेमुळे संगमवाडी रस्त्यावर काही काळ तणावाचं वातावरण दिसून आलं. नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रस्त्यावरील वादातून घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनांची माहिती घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात संबंधित महिलाचालक आणि जखमी तरुण यांची चौकशी केली जात आहे. कायद्याच्या चौकटीत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel




1 thought on “Pune : दोन कारचालकांत वाद; संतप्त महिलेने तरुणाला कारसमोर अडकवून तब्बल २ किमी फरफटत नेलं, पुण्यात धक्कादायक VIDEO समोर”