
Pune : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अमनसिंग गच्चड याच्या हत्येचा पोलिसांनी अखेर छडा लावला असून, या गुन्ह्यातील अमानुषता पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. केवळ जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका टोळीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि खेड शिवापूरच्या निर्जन डोंगरावर नेऊन त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
अमनसिंग इन्स्टाग्रामवर सक्रिय...
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि मृत अमनसिंग यांच्यात सप्टेंबर 2025 मध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. या वादात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता, ज्याचा राग त्याच्या मनात धुमसत होता. अमनसिंगचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा आधार घेतला. अमनसिंग इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचं पाहून आरोपींनी एका तरुणीच्या मदतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. 29 डिसेंबर रोजी याच तरुणीने त्याला भेटायला बोलावलं आणि तो नकळत मृत्यूच्या सापळ्यात अडकला.
|
|
मारण्याआधी शेवटची इच्छा विचारली
खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराळ भागात आरोपींनी अमनसिंगला गाठलं. हत्येपूर्वीचा घटनाक्रम एखाद्या थरारपटापेक्षाही भयंकर होता. आरोपींनी अमनसिंगला ठार मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारली. त्याने मागितलेली बिअर आणि सिगारेट त्याला देण्यात आली. इतकंच नाही तर क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपींनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खोदायला लावला आणि त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. तो जिवंत राहू नये या भीतीने त्याला खड्ड्यातून बाहेर काढून सर्जिकल ब्लेडने वार केले. त्यानंतर कोयत्याने गळा चिरून आणि जड दगडाने डोके ठेचून त्याचा जीव घेतला. हा थरार तब्बल चार तास चालू राहिला.
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
अमनसिंग घरी न परतल्याने त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करत बेळगाव येथून प्रथमेश आढळ आणि नागेश धबाले या मुख्य आरोपींसह एका अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी पोलिसांनी दुर्गम भागातून अमनसिंगचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं असून, एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, 'हनीट्रॅप'मध्ये सामील असलेल्या तरुणीचा शोध घेतला जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune : पुण्यात थरारक गुन्हा: हत्या करण्याआधी बिअर पार्टी, पीडिताकडूनच खड्डा खोदून घेतला; ४ तास रंगलेला कट”